श्रीगुरुचरित्र, अध्याय ३, ४, व ५

श्रीगुरुचरित्र (भाग २): भक्त-संरक्षणाचा सिद्धान्त आणि गुरूंचे त्रिमूर्ती वैभव | दुर्वास-अम्बरीष आख्यानाचे तत्त्वज्ञान

श्रीगुरुचरित्राच्या या महत्त्वपूर्ण भागात (तृतीय, चतुर्थ आणि पंचम अध्याय), आम्ही श्रीगुरुंच्या दिव्य स्वरूपाचे आणि त्यांच्या अवतरणामागच्या परमार्थिक कारणाचे सखोल विवेचन केले आहे।

श्री सिद्ध मुनी नामधारकाला आश्वासन देतात की श्रीगुरुंचे जीवनचरित्र साक्षात् अमृत आहे जे भक्त एकाग्रता आणि श्रद्धेने हे चरित्र वाचतात, त्यांचे पाप, रोग आणि ग्रह-पीडा तत्काळ नष्ट होतात। श्री सिद्ध स्पष्ट करतात की श्रीगुरु हे कृपासागर असून ते साक्षात् त्रिमूर्तीचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) अविभाज्य स्वरूप आहेत ।

या अध्यायांचा गाभा दुर्वास ऋषी आणि राजा अम्बरीष यांच्या आख्यानात दडलेला आहे अम्बरीष राजाने कठोरपणे एकादशी व्रत पाळले होते, परंतु पारणाच्या वेळी क्रोधी दुर्वास ऋषींच्या आगमनाने धर्मसंकट निर्माण झाले। राजा अम्बरीषाने सूक्ष्म जलपान करून व्रताचे रक्षण केले, ज्यामुळे दुर्वास क्रुद्ध झाले आणि त्यांनी शाप दिला। तेव्हा भक्तांचे संरक्षक असलेले श्री विष्णू त्वरित अम्बरीषांच्या मदतीला धावले ।

श्री विष्णूंनी स्पष्ट केले की भक्ताचा अनादर केल्यामुळे दुर्वासांचे तप निरर्थक झाले आहे या घटनेमुळेच श्री विष्णूंनी धर्म-रक्षणासाठी पृथ्वीवर श्री लक्ष्मीसहित दहा वेळा अवतार घेण्याचे वचन दिले या विवेचनातून हे गूढ तत्त्व उघड होते की श्रीगुरुंचा आश्रय म्हणजे भ्रम आणि मायावी प्रलोभनांपासून संपूर्ण मुक्ती आहे