|| भजन ||

काषायवस्त्र करदंडधारिणं, कमंडलुं पद्मकरेण शंखं । चक्रांगदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥१॥ औदुंबर: कल्पवृक्ष: कामधेनुश्च संगम: । चिंतामणी गुरो: पादौ दुर्लभौ भुवनत्रये॥२॥ कृते जनार्दनो देघस्त्रेतायां रघुनंदन :। द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभ: ॥३॥

~~~~~~~~~~~~~

धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥धृ०॥ पदोपदीं अपार झाल्या पुण्यांच्या राशीं । सर्वहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी ॥धन्य०॥ १॥ मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नाम संकीर्तनीं नित्यानंदे नाचती ॥धन्य०॥ २॥ कोटी ब्रह्महत्या हरती करिता दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लागे पायांस ॥धन्य०॥ ३॥ गुरुभजनाचा महिमा अगम्य निगमागमासी । अनुभव जे जाणती ते गुरुपदिचे अभिलाषी ॥धन्य०॥ ४॥ प्रदक्षिणा करुनि देह भावें वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ॥ धन्य ॥ ५ ॥

~~~~~~~~~~~~~

शांतहो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां । तू केवळ माता जनिता सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्त स्वजन भ्राता सर्वथा तूंची त्राता ॥ चाल ॥ भयकर्ता तूं भयकर्ता । दंडधरिता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥ अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसि यथार्था । तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥ चाल ॥ तूं तथापि दंडीसी देवा । कोणाचा मग करूं धांवा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥तूं नटसा होऊनि कोपी । दंडितांहि आम्ही पापीं । पुनरपिही चुकतां तथापि । आम्हांवरी नच संतापी ॥ चाल ॥ गच्छत:स्खलनं क्वापि । असें मानूनी नच हो कोपी । निज कृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥ ३ ॥ तव पदरीं असतां ताता । आडमार्गी पाउल पडता । सांभाळुनि मार्गविरता । आणता न दुजा त्राता ॥ चाल ॥ निज ब्रीदा आणूनि चित्ता । तूं पतितपावन दत्ता । बळें आतां आम्हां वरतां । करुणाघन तूं गुरुनाथा ॥ ४ ॥ सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार । तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ॥ चाल ॥ परि हरिसी करुणासिंधो । तूं दिनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ॥ ५ ॥

~~~~~~~~~~~~~

श्रीगुरु दत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ॥ ध्रु.॥ चोरें द्विजासी मारितां मन जें । कळकळले तें कळकळो आतां ॥ श्रीगुरु.॥ ॥ १ ॥ पोटशुळाने द्विज तडफडतां । कळकळले तें कळकळो आतां ॥ २ ॥ द्विजसुत मरतां वळले तें मन । हो कीं उदासीन न वळे आतां ॥ ३ ॥ सतीपति मरतां काकुळति येतां । वळले तें मन न वळें आतां ॥ ४ ॥ श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता । कोमल चित्ता वळवीं आतां ॥ ५ ॥ जय करुणाघन निजजन जीवन । अनुसूयानंदन पाहि जनार्दन ॥ ध्रु.॥ निज अपराधें उफराटी दृष्टी । होऊनि पोटीं भय धरूं पावन ॥ १ ॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर । रुससि न किंकर वरद कृपाघन ॥ २ ॥ वारि अपराध तूं मायबाप । तव मनीं कोण लेश न वामन ॥ ३ ॥ बालकापराधा गणिं जरि माता । तरि कोण त्राता देईल जीवन ॥ ४ ॥ प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदिं देवो ठाव देव अत्रिनंदन ॥ ५ ॥

~~~~~~~~~~~~~

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला । दयाळा तारि तारि मजला । श्रमलों मी या प्रपंच धामीं आलों शरण तुला ॥ धृ० ॥ करितां अटाटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व । म्हणउनि भजन तुझें मज देवा भासे सत्यत्व ॥ श्रीपाद० ॥ १ ॥ किंचित मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन । दयाळा करिसि उदार मन । चुकलो मीं या विषयसुखाच्या आहारांतून जाण ॥ श्रीपाद० ॥ कृष्णातटनिकटीं जो विलसे औदुंबर छायी । दयाळा औदुंबर छायी । हंस परात्पर भारति नाहक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥

~~~~~~~~~~~~~

सांगावे । कवण्‍या ठाया जावें । कवण्‍ातें स्मरावें कैसे काय करावें । कवण्‍यापरि मी रहावें । कवण येंउनि कुरुंदवाडी स्वामीतें मिळवावे । या हारीं । जेवावे व्यवहारीं । बोलावें संसारीं । घालुनि अंगीकारी । प्रतिपाळीसि जो निर्धारी । केला जो निज निश्चय स्वामी कोठें तो अवधारीं । या रानीं । माझी करुणा वाणी । काया कष्टी प्राणी । ऐकूनि घेशील कानीं । देशिल सौख्य निधानीं । संकट होऊनि मूर्च्छिंत असतां पाजिल कवन पाणी । त्या वेळां । सत्पुरुषांचा मेळा । पहातसे निज डोळां । लाविसि भस्म कपाळा । सांडी भय तूं बाळा । श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा । सागांवे ॥ १ ॥

~~~~~~~~~~~~~

अघोरसंकटनाशनस्तोत्रम् । श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव। भावहृद्य क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥ त्वं नो मातात्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम्। त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥ पापं तापं व्याधिमाधि च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम्। त ्रातारं नो वीक्ष ईशांस्त्वजूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥ नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं त्वं शरण्योऽकहर्ता । कुर्वात्रेयानुहं पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥ धर्मे प्रीती सन्मतिं देवभक्ति सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम्। भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥ श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स: श्रीदत्तप्रियो भवेत्॥

~~~~~~~~~~~~~